जेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पृथ्वीराज पाटील यांचा अर्ज दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याचा आज (बुधवार) दुसरा दिवस आहे. आजपासून अर्ज दाखल करण्यासाठी साडेपाच वाजेपर्यंत मुदत आहे. तालुक्यात १६ ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झाली आहे.

जेऊरमध्ये सरपंच व पाच प्रभागातून १५ जागांसाठी निवडणुक होत आहे. येथे ५ हजार ५० मतदार आहेत. येथे विरोधी गटाचे कोणाचे अर्ज येतील हे पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *