करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील केत्तूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी आज (बुधवारी) मच्छिंद्र चव्हाण यांच्यासह चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय सदस्यपदासाठी हरिश्चंद्र खाटमोडे, सुजित पाटील यांच्यासह 14 अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस होता. येथील सरपंचपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मच्छिंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्याबरोबर श्रीनिवास उगले, विलास सोनवणे, जयश्री देवकते, अमोल चव्हाण यांनीही अर्ज दाखल केले. यावेळी ऍड. अजित विघ्ने, लहू कांबळे, प्रवीण बिटले, राजेंद्र ठोंबरे, राजेंद्र खटमोडे उपस्थित होते.
