करमाळ्यात चिवटे, माळशिरस, माढ्यात मोहिते पाटील यांची विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती

Appointment of Ganesh Chivte Malshiras Mohite Patil in Madhya as Assembly Election BJP Chief

सोलापूर : भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांची करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखांच्या नियुक्त्या भाजपने केल्या आहेत. सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेनेला (शिंदे गट) विजयी मिळवून देतील असा विश्वास या नियुक्तीच्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

करमाळासह सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ रणजितसिंह मोहिते पाटील, बार्शी रणवीर राऊत, मोहोळ सुनील चव्हाण, सोलापूर शहर राजकुमार पाटील, सोलापूर शहर मध्य कांचना यन्नम, अक्कलकोट राजकुमार झिंगाडे, सोलापूर दक्षिण हणमंत कुलकर्णी, पंढरपूर राजेंद्र सुरवसे, सांगोला चेतनसिह केदार सावंत, माळशिरस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रमुख म्हणून निवडी झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *