Attendance of political circles at Jagtap royal reception

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप हे विवाहबंधनात अडकल्यानंतर आज (गुरुवारी) टेंभुर्णी- नगर महामार्गावरील झरे फाटा येथील प्रशस्त मंगल कार्यालयात शाही रिसेप्शन सोहळा रंगला. या सोहळ्याला राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. करमाळा तालुक्यासह बार्शी, सोलापूर, पंढरपूर, बारामती, माढा येथील जगताप कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या हजारो मंडळी उपस्थित होती.

भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार संजयमामा शिंदे, बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, माजी आमदार नारायण पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, बार्शी बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, सभापती प्रा. शिवाजी बंडगर, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील, दशरथ कांबळे, नवनाथ झोळ, चंद्रकांत सरडे, किरण कवडे, सोलापूर डिसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड, राजेंद्र बारकुंड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, डॉ. प्रदीपकुमार पाटील, संतोष पाटील, सुभाष शिंदे, ऍड. भारत कट्टे, ऍड. अजित विघ्ने, विवेक येवले, श्री. लबडे आदींसह हजारोंच्या संख्येने या सोहळ्याला मंडळी उपस्थित होती. माजी आमदार जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, नारायण जगताप हे उपस्थितांचे स्वागत करत होते.

ऍड. कमलाकर वीर, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, बाजार समितीचे सचिव विठ्ठलराव क्षीरसागर, पप्पू उकिरडे, बबनराव मेहेर आदींसह आजी- माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, बाजार समिती, खरेदी विक्री संघाचे, आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक व विविध गावचे सरपंच, सोसायटी चेअरमन व सदस्य यांचेसह नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *