करमाळा पंचायत समितीचे प्रभारी बीडीओ म्हणून भोंग यांच्याकडे पदभार

Rajaram Bhong as incharge BDO of Karmala Panchayat Samiti

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे पुन्हा रजेवर गेले आहेत. त्यामुळे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून राजाराम भोंग यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. ८ सप्टेंबरपर्यंत हा पदभार असणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राऊत हे रजेवर गेले होते. त्यानंतर ते पुन्हा रजेवर गेले आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी ते रजेवर गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

करमाळा पंचायत समितीचा प्रभारी गटविकास अधिकारी भोंग यांच्याकडे पदभार देण्यात आल्यानंतर त्यांनी सोमवारपासून त्यांनी कामकाज सुरु केले आहे. आषाढी वारीत राऊत व भोंग यांनी एकत्रित काम करून यशस्वी काम केले. त्यांचे कौतुक होत आहे. आषाढी एकादशी झाल्यानंतर राऊत हे रजेवर गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *