अजितदादांना समर्थन देणारे उमेश पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

सोलापूर : शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसू लागले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका मांडणार्यांवर कारवाई सुरु केली आहे. यातूनच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांची हकालपटी केली असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

पाटील यांनी अजित पवार यांना समर्थन दिले. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्रांमध्ये शुभेच्छा जाहिरात दिली. तसेच मुंबई येथे पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्र काढून त्यांची हकालपट्टी केली आसून पत्रामध्ये म्हटले आहे की, आपण २ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री, मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांना समर्थन दिले. आपले हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. आपली कृती राष्ट्रवादीच्या ध्येय धोरणांशी विसंगत आहे.

त्यानुसार आपणास पक्षाच्या सदस्यत्वावरुन व सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच आपणास सूचित करण्यात येत आहे की यापुढे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *