BJP is fighting directly with Congress in Rajasthan Chhattisgarh Madhya PradeshBJP is fighting directly with Congress in Rajasthan Chhattisgarh Madhya Pradesh

देशात होवू घातलेली सार्वत्रिक निवडणूक अवघे काही महिन्यांवर येवून ठेपली असताना राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेपूर्वीचा हा राजकीय धुरळा त्यामुळे बराच रंजक ठरेल, असे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी संगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपा आणि गांधी कुटुंबियांच्या भरवश्यावर कॉंग्रेस विधानसभेच्या रणसंग्रामात उतरेल.

लोकसभेचे गणित या निवडणुकांच्या निकालावर अवलंबून असल्याने सर्वच पक्षावर चांगली कामगिरी करण्याचा दबाब वाढला आहे. भाजप व कॉंग्रेस असा थेट सामना या राज्यांमध्ये असला तरी ही लढत इंडिया विरूद्ध एनडीए अशी होणार आहे. इंडिया आघाडीची एकी आणि प्रतिष्ठा देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने पणाला लागली आहे. निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये पंतप्रधानांच्या सततच्या दौऱ्यामुळे आठवड्याभरात केंद्रीय निवडणूक आयोग या राज्यांच्या निवडणूका घोषित करेल, असे भाकित वर्तवले जात आहे.

राजस्थानमधील गहलोत सरकार आणि छत्तीसगड मधील बघेल सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आणि मध्यप्रदेशात सत्ता वाचवण्यासाठी भाजप निवडणूक रिंगणात उतरणार आहे.राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये पक्षांतर्गत गटबाजी कॉंग्रेसची डोकेदुखी ठरू शकते.तर,मध्यप्रदेशातील सत्ते विरोधातील लहर सत्तांतर घडवून आणू शकते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.याच निकालाच्या आधारावर आगामी लोकसभा निवडणुकीचे समीकरणे अवलंबून असतील, असे देखील पाटील म्हणाले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *