करमाळा (सोलापूर) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहर भाजपच्या वतीने भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबीर झाले. यामध्ये ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले, अशी माहिती शहर उपाध्यक्ष कपील मंडलिक यांनी दिली आहे. अण्णाभाऊ साठे नगर येथे हे रक्तदान शिबीर झाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या शिबीराचे उदघाटन झाले. यावेळी अग्रवाल यांच्यासह भाजपचे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, मातंग एकता आंदोलनचे तालुकाध्यक्ष व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे शरद पवार, पप्पू मंडलिक, आंनद करंडे, आकाश आल्हाट, बाबा करंडे, करण आल्हाट आदी यावेळी उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहर भाजपच्या वतीने रक्तदान शिबीर
