करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील अर्जुननगर येथे लक्ष्मी आई यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर झाले आहे. यावेळी गावातील नागरिकांनी रक्तदान शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच चंद्रकला भोगे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. माजी सरपंच अनिल थोरात, मुकेश पाटोळे, समाधान भोगे, बप्पू ढवळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश थोरात, अमोल पवार, अभिमन्यू धुमाळ आदी ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. ग्रामसेवक मनोज लटके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
