भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या वतीने सोलापूर येथे विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. त्यात करमाळा येथील सावताहरी कांबळे यांची सोलापूर जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल त्यांचा करमाळा येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष जीवन होगले, जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नवनाथ साळवे, भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष पत्रकार सुनील भोसले, अक्षय शिंदे, प्रकाश अनंता कांबळे, सुनील काळे उपस्थित होते.