करमाळा ( सोलापूर) : करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळावेत म्हणून बहुजन संघर्ष सेनेने आज (सोमवारी) तहसील कार्यालयासमोर बोबबोब आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. करमाळा तालुक्याला सात महिन्यापासून तहसीलदार नाहीत. त्यामुळे नागरिकांची कामे होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आमदार संजयमामा शिंदे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही यावेळी त्यांनी निशाणा साधला. आंदोलनकर्त्याचे निवेदन नायब तहसीदार काझी यांनी स्वीकारले.
यावेळी ऍड. राहुल कांबळे, अंगद लांडगे, कालिदास कांबळे, तुकाराम घोंगडे, नवनाथ खरात, अधिक शिंदे, विष्णू रणदिवे, रवी घोडके, मनोहर कोडलिंगे, दत्ता गव्हाणे, बापू पवार, संदीप मारकड, दादा गायकावड, दत्ता राक्षे, बटू हजारे, सुंदरदास काळे, चंद्रशेखर पाटील, अर्जुन भोसले, विनोद शिंदे, प्रदीप शिंदे, मनोहर शिंदे, अशोक शिंदे, प्रेमचंद कांबळे, संतोष लांडगे, बापू गायकवाड, दादा गायकवाड, संतोष गायकवाड, मारुती भोसले, शिवाजी कुंभार, गोविंद लांडगे, नागनाथ राऊत, गौतम शिंदे, श्रीरंग लांडगे, पप्पू सरोदे, कैलास सरोदे, हनुमंत सरोदे, कचरू जगदाळे, कैलास कदम, आबा कदम, लखन कदम, भीमराज कदम, हनुमंत खरात, आजिनाथ अवताडे, अमोल कोडलिंगे, संभाजी मारकड, मच्छिंद्र काळे, बापू भोसले, लक्ष्मण भोसले, बबन भालेराव, रमेश भोसले, भाऊ भोसले, अनुप चव्हाण उपस्थित होते.