Six twowheeler ambulances will be working in Manoj Jarange meeting in Wangi Karmala talukaSix twowheeler ambulances will be working in Manoj Jarange meeting in Wangi Karmala taluka

वांगी नंबर १ (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) सांयकाळी ७ वाजता होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेत आपत्कालीन परिस्थितीत सहा दुचाकी रुग्णवाहिकेचा वापर केला जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे यांचा समाज बांधवांशी संवाद दौरा सुरु झाला आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्यात उजनी धरणाच्या कुशीत वांगी १ येथे सभा होणार आहे.

सकल मराठा समाज करमाळा तालुकाच्या वतीने या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणात समाज बांधव उपस्थित राहतील. हा अंदाज धरून संपूर्ण नियोजन केले जात आहे. त्यासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून वांगी परिसरातील सर्व गावांमधील समाज बांधव ही सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

सभेच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तत्काळ उपचार मिळावेत यासाठी सहा दुचाकीवर १२ स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. हे स्वयंसेवक एखाद्याला चक्कर आली किंवा इतर काही झाले तर तत्काली गर्दीतून त्याच्याजवळ जाऊन त्याला रुग्णवाहिका किंवा डॉंक्टरांच्या पथकाजवळ सोडण्यासाठी मदत करणार आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधव परिश्रम घेत आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *