सोलापूर : अभ्यागतांनी कार्यालयीन कामकाजी दिवसांमध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यापूर्वी कळविण्यात आले होते. परंतु सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना व जिल्ह्याच्या दूरवरच्या भागातून तक्रारी घेऊन जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना सायंकाळच्या वेळेमुळे अडचणी निर्माण होत होत्या, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी अभ्यागत भेटीच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागरिकांच्या विनंतीची दखल घेतली. ते यापुढे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सोमवार ते शुक्रवार दुपारी 12.45 ते 2:15 वाजता या कालावधीत अभ्यागतांना भेटणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांनी निश्चित केलेल्या दु. 12.45 ते दु. 2.15 वेळेतच जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलवर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील अनेक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान कुमार आशीर्वाद यांनी या वेळेत बदल केला आहे.
अभ्यागतांना भेटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची वेळ निश्चित