Dikasal bridge connecting Solapur Pune district startedDikasal bridge connecting Solapur Pune district started

करमाळा (अशोक मुरूमकर) : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भीमा नदीवरील डिकसळ पुलाचे (कोंढारचिंचोली ते डिकसळ) काम आजपासून (शनिवार) सुरु झाले आहे. पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. या पुलाचे काम व्हावे यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन जुन्या रेल्वे लाईनवर डिकसळ- कोंढारचिंचोली दरम्यान हा पुल होता. आठ महिन्यापूर्वी या पुलाचे एका बाजूच्या बांधकामाचे काही दगड निखळले होते. त्यामुळे या ठिकाणी मोठा बोगदा पडला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील जड वाहतूक बंद केली होती.

डिकसळ पुलासाठी महाविकास आघाडीचे सरकार असतानाही आमदार शिंदे यांचे प्रयत्न सुरु होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी या कामासाठी निधी मिळवला. प्रशासनाने पुलाचे डिझाईन दिलेले असतानाही संबंधित ठेकेदाराने त्यांच्या पद्धतीने डिझाईन करण्यासाठी वेळ घेतला होता. त्यामुळे काम लांबले होते. तीन वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांसाठी भिगवण, बारामती, दौंड, इंदापूरला जाण्यासाठी बाजारपेठेचा दळणवळणासाठी हा पूल महत्वाचा आहे. यापूर्वी येथे काम सुरु झाले होते मात्र काही अडचण आल्यामुळे काम थांबले होते. आता काम सुरु झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *