जेऊर येथे जमिनीच्या कारणावरून दमदाटी; करमाळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा

Fraude de una mujer en nombre del lavado de oro Robo de una tolas y media de oro metiéndose algo en los ojos captado en CCTV

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊर येथे जमिनीच्या कारणावरून शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. याबाबत करमाळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. किसन माने, त्यांची पत्नी व एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. नामदेव तुकाराम गुंजाळ (वय ७५) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींनी शेतात पेरणी सुरु असताना येथे पेरणी करायची नाही, असे म्हणून शिवीगाळ करून दमदाटी केली असून जीव मारण्याची धमकी दिली आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *