Call for participation in Global Skills Competition 2024

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाबरोबर मुस्लीम समाजाला सुद्धा कुणबीचे दाखले मिळावेत, अशी मागणी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या माध्यमातून प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कुणबीच्या नोंदी पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली. समितीच्या माध्यमातून जुन्या महसुली नोंदी पाहण्यासाठी राज्यातील सर्व तहसील कार्यालयात शोध मोहीम सुरु असुन ते शोधत असताना निजामकालीन दस्तऐवज किंवा जन्म- मृत्यू दाखले, शाळेचे दाखले व इतर महसुली नोंदीमध्ये मराठा समाजाच्या नोंदीबरोबर मुस्लीम समाजातील नागरिकांच्या जुन्या महसुली नोंदीमध्ये कुणबी मुस्लीम असा उल्लेख असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाला सुद्धा कुणबीचे दाखले देण्यात यावेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *