सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पशुसवंर्धन विभागाअंतर्गत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे कुक्कुटपालन प्रशिक्षणाची तुकडी क्रमांक 1 चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर डॉ. नवनाथ नरळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक व यशोगाथा सधन कुक्कुट विकास गटचे प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांनी विषद केले.
डॉ. नरळे यांनी शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय नगदी असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीत आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सदर उद्योगाबाबत बँकेच्या आडचणी उद्भवल्यास संबधित गट विकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी (बि) यांच्याशी संपर्क साधावा, असे सुचित केले.
सदर प्रशिक्षणाची तुकडी 10 ते 24 जून या कालावधित झालेली असून, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री जमादार यांनी परिश्रम घेतले. तसेच पुढील प्रशिक्षण तुकडीस जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ स्नेंहंका बोधनकर यांनी केले आहे.