50 crore development works in Karmala city and taluka will be completed soon50 crore development works in Karmala city and taluka will be completed soon

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील प्रमुख चार जिल्हा मार्ग मजबुत करण्यासाठी 10 कोटी 92 लाख निधीची तरतूद मार्च 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये झालेली होती. परंतु सरकार बदलानंतर या कामावर स्थगिती आली होती. या कामावरील आता स्थगिती उठली आहे. त्यामुळे रखडलेली कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

आमदार शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये रस्ते विकासासाठी 32 कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यातील मंजूर कामांपैकी 4 कामावरती फडणवीस- शिंदे सरकारने स्थगिती दिली होती. ही स्थगिती सरकारच्या अध्यादेशानुसार उठली असून प्रमुख जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरणाचे काम यामुळे पूर्ण होणार आहे.

‘या’ कामावरील स्थगिती उठली

  1. बोरगाव करंजे मिरगव्हाण निमगाव गौंडरे नेरले ते वरकुटे निंभोरे लव्हे जेऊर रस्ता प्रजिमा क्र.6 – 2 कोटी 85 लाख.
  2. मिरगव्हाण अर्जुननगर शेलगाव क सौंदे वरकटणे कोंढेज रस्ता प्रजिमा क्रमांक 8 – 1 कोटी 90 लाख.
  3. कोर्टी दिवेगव्हाण पारेवाडी रेल्वे स्टेशन ते केतुर 2 ते पोमलवाडी रस्ता प्रजिमा -124 – 2 कोटी 85 लाख.
  4. पारेवाडी राजुरी अंजनडोह झरे कुंभेज निंभोरे मलवडी दहिवली कन्हेरगाव ते वेणेगाव प्रजिमा 4- 3 कोटी 32 लाख.

या रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजुरी मिळालेल्या या रस्त्यावरील स्थगिती उठविण्यासाठी आपण उच्च न्यायालयामध्ये याचीकाही दाखल केलेली होती .त्याचप्रमाणे विद्यमान सरकारमध्ये उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची एन्ट्री झाल्यामुळे सदर स्थगिती उठण्यास मदत झाल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *