करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या वतीने 11 वी व 12 वीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील 410 मुलींना महाराष्ट्र राज्य अहिल्याबाई होळकर मोफत पास देण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक व एस. टी. आगारातील लिपिक रेश्मा शेख पठाण यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये पासाचे वाटप केले.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शनातून हे पास वाटप करण्यात आले. शेख पठाण यांनी महाविद्यालयातील मुलींना यावेळी एसटी पासाबाबतचे वेगवेगळे नियम सांगून पासाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वय प्रा. लक्ष्मण राख यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हनुमंत भोंग यांनी केले तर आभार डॉ. हरिदास बोडके यांनी मानले.