Karmala bus stand will be pothole free Two crores for concretizationKarmala bus stand will be pothole free Two crores for concretization

करमाळा (सोलापूर) : करमाळा बसस्थानक लवकरच खड्डेमुक्त होणार आहे. या परिसराचे काँक्रिटीकरण होणार आहे. यासाठी दोन कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. माजी आमदार पाटील म्हणाले, करमाळा एसटी स्टॅन्ड परिसर खड्डेमुक्त व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करत होतो. महाविकास आघाडी सरकार असताना आपण या कामासाठी 1 कोटी 89 लाख निधी मंजूर करुन घेतला होता. परंतू नंतर तांत्रिक अडचणी येत राहिल्या व या कामास निविदा काढण्यात येऊनही सुरुवात झाली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला होता.

पुढे बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले, पहिली मंजुरी स्थगिती यादीत अडकल्याने नवीन प्रशासकीय मंजुरी घेऊन या कामास आता दोन कोटी रुपये खर्च करता येणार आहेत. यामध्ये संपूर्ण भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. करमाळा बसस्थानक अहमदनगर, पुणे व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर आहे. येथे प्रवाशांची व वाहनचालकांची गैरसोय दुर होणे गरजेचे होते.

यापूर्वी 2014- 15 मध्ये करमाळा व कुर्डूवाडी बसस्थानकांचे नुतणीकरण झाले असून आता नव्याने अपुरी कामे पूर्ण करण्यात आपणास यश आले आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सहकार्य केले आहे. जेऊर येथील बसस्थानक नूतनीकरणासाठी आपण सरकारकडे दोन कोटी निधी मागितला असून या कामाचाही पाठपुरावा सुरु आहे. करमाळा बसस्थानक आगारातील तांत्रिक विभागातील कर्मचारी रिक्त पदे, आगारास नवीन बसगाड्या तसेच लांबपल्यासाठी शिवशाही बसेसची मागणी आपण केली असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आपण चर्चाही केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *