करमाळा : देवीचामाळ येथे दहा फुटाचा रस्ता मिळावा म्हणून स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालयासमोर रामलिंग सोरटे यांनी सहकुटुंब उपोषण केले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, देवीचामाळ येथे घर नंबर २४७ साठी दक्षिण- उत्तर असणाऱ्या खुल्या जागेतून वागणुकीसाठी कायमस्वरूपी १० फुटाचा रस्ता मिळावा. दोन वर्षांपासून आम्ही रस्त्याची मागणी करत आहोत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामपंचायत आम्हाला पाच फूट रस्ता देईला तयार आहे. मात्र त्यातून घरपर्यंत वाहनही जाणार नाही. त्यामुळे दहा फूट रस्ता आवश्यक आहे. याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
