करमाळा (सोलापूर) : कुकडी धरणातून करमाळा तालुक्यातील मांगी तलाव भरून घेण्यात यावा अशी मागणी पोथरे येथील शहाजी झिंजाडे यांनी केली आहे. मांगी तलाव भरल्यास करमाळा तालुक्यातील वडगाव दक्षिण, वडगाव उत्तर, पुनवर, मांगी, पोथरे, निलज, बिटरगाव आदी गावाच्या शेतीसाठी उपयोग होतो. यावर्षी पाऊस लांबल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणूनहा तलाव भरणे आवश्यक आहे, असे झिंजाडे म्हणाले आहेत.

