साडेतील जिल्हा परिषद शाळांमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

Flag Hoisting by ExServicemen in Zilla Parishad Schools in Saade

करमाळा (सोलापूर) : साडेतील जिल्हा परिषद शाळेमध्ये केंद्रप्रमुख वसंत बदर यांच्या नियोजनाने सर्व प्राथमिक शाळांमध्ये गावातील माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. केंद्र शाळा साडे येथे माजी सैनिक जगन्नाथ सुपे, रोकडेवस्ती येथे रशीद शेख, गोमेवस्ती येथे नागनाथ ढवळे, इंदिरानगर येथे परसुराम जाधव, शिंदे वस्ती येथे रामचंद्र रोकडे, आवताडे वस्ती येथे प्रल्हाद माने, नेमानेवस्ती येथे बलभीम सुपे, आडेकर वस्ती येथे धनंजय घाडगे या साडे गावातील माजी सैनिकांचे हस्ते ध्वजारोहण केले. या सर्व उपक्रमाचे कौतुक सर्व साडे ग्रामस्थांबरोबर गटविकास अधिकारी राजाराम भोंग, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी नलवडे व नीळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *