For getting selected on BMC Adv Kunal Yevle felicitated by MLA Sanjay Shinde in Karmala

करमाळा (सोलापूर) : येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते IBPS मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून बृहन्मुंबई महापालिकामध्ये (BMC) सहायक विधी अधिकारी, वर्ग 2 (Assistant Law Officer, Class-2) पदी निवड झाल्याबद्दल ॲड. कुणाल उदय येवले यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मकाईचे माजी संचालक विवेक येवले, राष्ट्रवादीचे आशपाक जमादार, राष्ट्रवादीचे तालुका कार्यध्यक्ष सुजित बागल, ॲड. प्रितम वीर, ॲड. अपुर्व येवले उपस्थित होते.

ॲड. कुणाल येवले हे पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत आहेत. त्यांची आयबीपीएसच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून बृहन्मुंबई महापालिकामध्ये सहायक विधी अधिकारी, वर्ग- 2 (असिस्टंट लॉ ऑफिसर, क्लास-2) पदी निवड झाली आहे. या पदासाठी महापालिकेने परीक्षा घेतली होती. त्याचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.

ॲड. कुणाल यांनी वकिली करत करत अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. ॲड. कुणाल हे स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार कै. शंकरराव येवले यांचे नातू व ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष उदय येवले यांचे चिरंजीव आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *