Selection of Riya Pardeshi for the Delhi Parade on behalf of the university from YCM Karmala

करमाळा : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील रिया परदेशी या विद्यार्थिनीची दिल्ली येथे 26 जानेवारी 2024 च्या प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय संचालनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधून निवड करण्यात आली. त्याबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे व वरिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे व त्यांचे सहकारी प्रा. प्रदीप मोहिते, डॉ. विजया गायकवाड, प्रा. सुधीर मुळीक यांनी अभिनंदन केले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निवडण्यात आलेल्या १२ विद्यार्थिनींपैकी रिया परदेशी हिची निवड करण्यात आल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्रकुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ योगिनी घारे यांनीही अभिनंदन केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *