Fund of 2 crores sanctioned through Chief Minister Eknath Shinde for Jeur bus standFund of 2 crores sanctioned through Chief Minister Eknath Shinde for Jeur bus stand

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील जेऊर बसस्थानकासाठी विस्तारीकरण व सुशोभीकरणासाठी दोन कोटी मंजूर करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेशं चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्नई यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते, असे शिवसेना शहर प्रमुख संजय शीलवंत व उपशहर प्रमुख नागेश गुरव यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले.

यामध्ये म्हटले आहे की, सोलापूरचे विभागीय अभियंता श्रीकांत सूर्यवंशी यांनी जेऊर बसस्थानकाला भेट देऊन प्रस्ताव तयार केला होता. प्रस्ताव तयार करण्यापासून मंजुरी मिळेपर्यंत जिल्हाप्रमुख चिवटे यांनी केलेले प्रयत्न एसटी कर्मचाऱ्यांना माहित आहेत. वर्षा बंगल्यावर या संदर्भात चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांच्या उपस्थितीत व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्न यांनी तात्काळ महेश चिवटे यांच्या पत्रावर तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश सोलापूर विभागाचे नियंत्रक भालेराव यांना दिले होते.

मुख्यमंत्री शिंदे, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व प्रश्नमार्गी लागत आहेत. जेऊरच्या बसस्थानकाला बायपास रोडला जोडण्यासाठी प्रस्तावसुद्धा सादर केलेला आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. करमाळा बस स्थानकासाठी दोन कोटी व जेऊर बस स्थानकासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यासाठी महेश चिवटे यांनी केलेले प्रयत्न बद्दल आभारी आहोत. येणाऱ्या काळात लोकसभागातून एस टी महामंडळ अजून प्रगतीपथावर नेण्याचे काम करू, असे सांगण्यात आले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *