BJP courageous Mohite Patil visit to Karmala talukaBJP courageous Mohite Patil visit to Karmala taluka

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज (गुरुवारी) दौरा झाला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगितले आहे. ९: ३० वाजता त्यांनी राजुरी येथून हा दौरा सुरु केला. त्यानंतर सावडी, गोरेवाडी, कोर्टी, विहाळ, रावगाव, वंजारवाडी व लिंबेवाडी येथे भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दलही शेतकऱ्यांना माहिती दिली. दरम्यान पाऊस लांबल्याने मदत मिळणे आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांनी मोहिते पाटील यांच्याकडे केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजित तळेकर, भाजपचे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, राजुरीचे अबासाहेब टापरे हे उपस्थित होते. विहाळ येथे झालेल्या दौऱ्यावेळी संजय चोपडे, मोहन मारकड, प्रदीप हाके, किसन काळे, दशरथ काळे, अशोक चोपडे, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *