Gramodyog Bharari Award given to Mangesh Chivte by the GovernorGramodyog Bharari Award given to Mangesh Chivte by the Governor

करमाळा : महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा ‘ग्रामोद्योग भरारी’ पुरस्कार करमाळा येथील मुक्ताई गारमेंट या उद्योग समूहाला देण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे मंगेश चिवटे यांनी हा पुरस्कार स्विकारला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, सचिव हर्षदीप कांबळे, खादी ग्रामोद्योग महामंडळचे अध्यक्ष रवींद्र मराठे, मुख्य कार्यककारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, श्रेय फाउंडेशनच्या सीमा सिंग यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागात पंतप्रधान रोजगार योजनेतून (PMEGP) मिळालेल्या अर्थसहायमधून यशस्वी उद्योग उभा केल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील निवडक ८ उद्योजकांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यपाल बैस म्हणाले, खादी ग्रामोद्योगचा प्रमुख उद्देश म्हणजे ग्रामीण भागात छोटे- छोटे उद्योग उभारून या माध्यमातून गावातच रोजगार निर्माण करणे हा आहे. शहरात वाढणारे लोंढे थांबवून शहरांवरील वाढता ताण कमी करायचा असेल असेल तर ग्रामीण भागात लहान – लहान उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग महामंडळाची भूमिका महत्त्वाची आहे.

यावेळी बोलताना राज्याचे उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, आज पुरस्काराने सन्मानित झालेल्या उद्योजकांवर आता जबाबदारी वाढली आहे, यापुढील काळात आणखी व्यवसाय वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण करा असे आवाहन केले. कारण , आज देशात नोकरी मागणाऱ्या हातांपेक्षा नोकरी देणाऱ्या उद्योजकांची गरज आहे.

चिवटे म्हणाले, करमाळयातील श्री कमलादेवी औद्योगिक वसाहतीमध्ये मुक्ताई गारमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत ३० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मुक्ताई गारमेंटच्या माध्यमातून पंचक्रोशीतील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांना डोळ्यांसमोर ठेवून शर्ट, शालेय युनिफॉर्म निर्मिती सुरू केली. यामुळेच अल्पावधीतच स्पार्क शर्ट ब्रँड झाला असून याचे सर्व श्रेय माझे आई -वडील मोठे बंधू उद्योजक श्री महेश चिवटे आणि या शर्ट फॅक्टरी साठी अविश्रांत मेहनत घेणारे आमच्या सर्व कर्मचारी बांधवाना जाते. आजचा ग्रामोद्योग भरारी पुरस्कार हा या सर्वांना अर्पण करत आहे. येणाऱ्या काळात करमाळयात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योग मंत्री सामंत आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *