समृद्धी एक्स्प्रेस वेवर सिंदखेडराजाजवळ (बुलढाणा) एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री हा अपघात झाला असून यामध्ये २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सिटीलिंक ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूरहून मुंबईकडे जात होती. त्या बसचा अपघात झाला आणि बसमध्ये जळून राख झाली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बसने पेट घेतला. काही वेळातच बसला आग लागली. आगीने इतका पेट घेतला की काही समजेपर्यंत २६ जणांनी आपला जीव गमवलेला होता. बुलढाणाचे एसपी सुनील कडासेन यांच्याकडील माहितीनुसार बसमध्ये ३३ प्रवासी होते. त्यापैकी ३ निष्पापांसह २६ जणांचा मृत्यू झाला. याचवेळी ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही पहिल्यांदा लोखंडी खांबाला नंतर दुभाजकाला धडकून उलटीली. त्यात बसचा टायर फुटला, त्यानंतर ती एका खांबाला आणि डिव्हायडरला धडकली, यानंतर बसने पेट घेतला. बस दुभाजकाला धडकली त्यावेळी समोरचा एक्सेल तुटला होता. समोरची चाक बस पासून वेगळी झाली होती. त्यानंतर आग लागली. बस डाव्या बाजूला पलटी झाल्यानं दार बंद झालं आणि बाहेर पडण अशक्य झालं. या अपघातानंतर काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. काचा फोडून बाहेर आलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे. बस अपघातग्रस्त झाल्यानंतर बसमधील काही तरुणांनी काचा फोडल्या आणि ते बाहेर आले. त्यांनी काही प्रवाशांना बाहेर काढले. हा अपघात १.२६ मिनिटांनी अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये नागपूर,वर्धा आणि यवतमाळ मधील प्रवासी होते.
या अपघाताची माहिती मिळताच एसपीसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेत बसचा चालक बचावला आहे. त्याने सांगितले की, टायर फुटल्यानंतर बस अनियंत्रित झाली, त्यानंतर बस उलटली आणि आग लागली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, अपघाताचा बळी ठरलेली लक्झरी बस नागपूरहून मुंबईकडे जात असताना पिंपळखुटाजवळ पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एका खांबाला धडकून दुभाजकाला धडकली. त्यात आग लागली. पोलिसांनी सांगितले की, आठ प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रवासी नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील रहिवासी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अपघातग्रस्त बसमधील मृतकांची ओळख पटवण्याकरिता DNA टेस्ट शिवाय पर्याय नसल्याचं पोलीस यंत्रणेचं म्हणणं आहे. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंटवरून ऑफिसमधून मृतकांच्या नाव मिळण्याकरता पोलिस यंत्रणा व प्रशासन प्रयत्नशील आहे. अपघात ग्रस्त बसमधील प्रवासांचे मोबाईलदेखील जळून खाक झाल्याने संपर्क होणे कठीण होत आहे.