Karmala APMC

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप गटाचे दोन व सावंत गटाचे दोन संचालक बिनविरोध झाले आहेत. याची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. व्यापारी मतदार संघात दोन जागांसाठी दोन व हमाल- तोलार गटात एका जागेसाठी दोन अर्ज आले आहेत. ते एकाच उमेदवाराचे आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज (शुक्रवारी) तीन वाजेपर्यंत १८ जागांसाठी १६१ अर्ज दाखल झाले आहेत. जगताप, पाटील, बागल व शिंदे या चारही प्रमुख गटांच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असल्याने ही निवडणूक कशी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाचे दिग्विजय बागल, उपसभापती चिंतामणी जगताप, माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील, सभापती प्रा. शिवाजी बंडगर, शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल, चंद्रकांत सरडे, मोहिते पाटील समर्थक डॉ. अमोल घाडगे, भाजपचे दीपक चव्हाण, अमरजित साळुंखे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप आदीनी अर्ज दाखल केले आहेत.

यांनी केले अर्ज दाखल
सहकारी संस्था (सर्वसाधारण) :
माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, रामदास गुंडगिरे, सागर दौड, जनार्दन नलावडे, विजयसिंह नवले, दिग्विजय बागल, कल्याण सरडे, शिवाजी बंडगर, अशोक हनपुडे, आनंदकुमार ढेरे, काशिनाथ काकडे, नवनाथ दुरंदे, दादासाहेब जाधव, देवानंद बागल, पृथ्वीराज पाटील, राहुल गोडगे, वैभव पाटील, रामेश्वर तळेकर, किरण पाटील, संतोष शेळके, दत्ताञय गव्हाणे, रंगनाथ शिंदे, सुनील सावंत, धनंजय डोंगरे, दत्तात्रय बदे, अमरजित साळुंखे, तात्यासाहेब शिंदे, महादेव कामटे, महेशराजे भोसले पाटील, सुजित बागल, अशोक शेळके, ज्योतीराम नरुटे, दिगंबर नाझरकर, कुलदीप पाटील, चिंतामणी जगताप, राहुल जगताप, प्रताप जगताप, विशाल केवारे, किरण कवडे, सुनील सावंत, दादासाहेब सरडे, तात्यासाहेब जाधव, नवनाथ दुरंदे, शरद देवकर, बापूराव लोखंडे, पृथ्वीराज राजेभोसले, युवराज मेरगळ, देविदास बरडे, रवींद्र गोडगे, छगन शिंदे, अतुल राऊत, करू गव्हाणे, दीपक चव्हाण, विलास कोकणे व सुहास घोलप.

महिला राखीव : देवशाला पाटील, भारती भोसले, शैलाबाई लबडे, साधना पवार, सुलन नलवडे, शैलजा मेहेर, सीता पाटील, नंदाबाई केवारे, अरुणी हिवरे, सविता राऊत, साधना मंगवडे, रुपाली जाधव, विद्या सरडे, प्रेरणाराणी राजेभोसल व सविता माने. इतर मागासवर्ग : विशाल केवारे, जया झिंजाडे, आंनद अभंग, धनंजय शिरसकर, रामहरी कुदळे, शैलजा मेहेर, शिवानी राखेंडे, राजाराम जाधव व रियाज मुलाणी. भटक्या विमुक्त : प्रा. शिवाजी बंडगर, नागनाथ लकडे, अशोक शेळके, संदीप मारकड, बापूसाहेब पाटील, जनार्दन मारकड, लक्ष्मण खोमणे, छगन शिंदे व गणेश काळे.

ग्रामपंचायत (सर्वसाधारण) : हरिश्चंद्र झिंजाडे, विलास काटे, विलास पाटील, राजाराम जाधव, काशिनाथ काकडे, रामहरी कुदळे, नवनाथ झोळ, किरण फुंदे, पृथ्वीराज पाटील, जयराम सोरटे, अजित तळेकर, ज्योतीराम नरुटे, दादासाहेब जाधव, प्रवीण भोसले व गोरख लबडे, संजय तोरमल, रंगनाथ शिंदे, सुनील सावंत, महेशराजे भोसले पाटील, उर्मिला पवार, शहाजी माने, डॉ. अमोल घाडगे, धनराज मोरे, दत्तात्रय बदे, अमरजित साळुंखे, महादेव जाधव, कुलदीप पाटील, बालाजी तरंगे, दत्तात्रय गव्हाणे, अमोल दुरंदे, प्रा. शिवाजी बंडगर, लक्ष्मण खोमणे, संदेश शेळके, देविदास बरडे, दिग्विजय बागल, रावसाहेब शिंदे, रुक्मिणी एकाड, निशेल एकाड, अरुणी हिवरे, धनाजी ढेरे, अप्पासाहेब चौगुले, दीपक चव्हाण, सुहास घोलप, चंद्रकांत सरडेव अजिनाथ विघ्ने.

एससी : शहाजी धेंडे, मनीषा कांबळे, बाळू पवार, सारिका चांदणे, सचिन अब्दुले, राजू कदम, औदूंबर मोरे, सुहास ओहळ, राजू कदम, दादा गायकवाड. आर्थिक दुर्बल : आनंदकुमार ढेरे, हनुमंत ढेरे, कल्याण सरडे, हनुमंत आवटे, उर्मिला पवार, आदिनाथ मोरे, कुलदीप पाटील, मच्छिन्द्र वाघमारे, सुनील सावंत, आशिष गायकवाड, भारत बागल. व्यापारी मतदारसंघात मनोज पितळे व परेशकुमार दोशी. हमाल- तोलार : वालचंद रोडगे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *