करमाळा : करंजे येथील पप्पूशेठ सरडे व संतोष फुके यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी तात्या पाटील, विलास सरडे, उमेश सरडे, नवनाथ पवार, विलास पवार, सचिन सरडे उपस्थित होते. चिखलठाण येथील सभेदरम्यान त्यांनी उपस्थित राहून प्रवेश करत मोहिते पाटील यांना पाठींबा दिला आहे.

