करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. किल्ला वेस येथून सायंकाळी ५. ५० वाजता पहिला मानाचा श्रीमंत राजेराव रंभा मंडळ, देविचामाळ येथील हत्तीवर विराजमान झालेला गणपती निघाला. त्यानंतर मानाचा लोकप्रिय हनुमान तरुण मंडळ किल्ला वेस येथील नंदीवर विराजमान झालेला गणपती निघाला. गुलालाची उधळण आणि पारंपारिक वाद्यात जल्लोष करत ही मिरवणुक निघाली आहे. पोलिसांचा यावेळी मोठा बंदोबस्त आहे. मिरवणुक पाहण्यासाठी महिलांचीही गर्दी आहे.
करमाळा गणेश विसर्जन मिरवणुक : किल्ला वेस येथून मानाचा पहिला गणपती निघाला
