करमाळा (सोलापूर) : येथील किंडरजॉय सीएससी बालविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील होत. प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका डॉ. अंजली श्रीवास्तव, सीएससीचे करमाळा तालुका समन्वयक विशाल शिंपी व डॉ. शेलार हे उपस्थित होते. कमलाई शैक्षणिक व बहुद्दीशीय संस्थचे अध्यक्ष धनराज कांबळे यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमामध्ये सर्व धर्म, बंधुभाव, आई वडिलांविषयीचा आदरभाव, प्रेम, संस्कृती या थीमवर गाणे सादर केली. सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार वलटे यांनी केले. सिद्धी कदम, बालविद्यालयाच्या संचालिका राजश्री कांबळे, मीनाक्षी ढाळे, सुप्रिया जोगदंड, सीमा खराडे, राबिया बागवान, अर्चना जाधव, वंदना काळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

