Vijay Warriors team became the winner of Shri Agrasen Cricket LeagueVijay Warriors team became the winner of Shri Agrasen Cricket League

पुणे : श्री महाराजा अग्रसेन यांच्या जंयती निमित्त फिटनेस मंत्र देण्याच्या उद्देशाने आयोजित जिल्हास्तरीय क्रिकट स्पर्धेच्या अंतीम सामन्यात विजय वॉरियर्स संघाने रॉकी इलेव्हन संघास 6 रनाने परावभव करून श्री अग्रसेन क्रिकेट लीगची ट्राफी आपल्या नावावर केली आहे. तसेच महिला गटात टीम फिटनेस मंत्रा संघाने ओएसआर स्मॅशर्स संघाचा पराभव करित श्री अग्रसेन क्रिकेट लीग जिंकली. तेजस बन्सल हा पुरुषगटात सामनावीर ठरला तर महिला गटात सोनिया अग्रवाल सामनावीर ठरली.

श्री महाराजा अग्रसेन यांच्या जंयती निमित्त पुणे जिल्ह्यातील अग्रवाल बंधुना एकजूट करण्यासाठी अखिल भारतीय अग्रवाल सभाच्या अंतर्गत महाराजा-अग्रसेन जयंती क्रिकेट स्पर्धाची स्थापना करून अग्रसेन क्रिकेट लीगचे आयोजन करणयात आले होते. अग्रसेन क्रिकेट लीग मध्ये अग्रवाल समाजाच्या 18 गोत्रांचे प्रतिनिधित्व करणारे 18 संघ सहभागी झाले होते. यामध्ये 12 पुरुष गट, 4 महिला गट आणि 2 मुलांचे गट अशा 18 गटांमध्ये हा सामना खेळवला गेला. गंगाधाम मार्केटयार्ड येथील डाऊन टाऊन ग्राऊंड वर अंतिम सामने संपन्न झाले. विजय वॉरियर्स संघाने 7 गडी राखून सात ओव्हर मध्ये राखून 71 रन केले होते. तर रॉकी इलेव्हन संघाचे सर्व खेळाडू बाद झाले आणि फक्त 65 रन बनविले. प्रत्येक सामना टेनिस बॉलचा 8 ओव्हरचा होता. विजेत्या संघाला सुवर्ण प्लेटेड ट्रॉफी आणि उपविजेत्या संघाला सिल्व्हर प्लेटेड ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक पुरस्कारही देण्यात आले.

अध्यक्षः अनिल मित्तल, उपाध्यक्ष : दिनेश गुप्ता, नितीन अग्रवाल, अनिल अग्रवाल, रेणू अग्रवाल, प्रवीण गोयल, विकास गुप्ता, नरेंद्र मित्तल, संजय मित्तल, संदीप अग्रवाल आदींनी श्री अग्रसेन क्रिकेट लीग यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *