करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरातून भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळवून देणार आहे. यासाठी भाजपसह मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याना बरोबर घेऊन रणनीती आखली जात आहे. आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाच्या कार्यकर्त्यांह सर्वांना बरोबर घेऊन काम केले जाणार आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामा ढाणे व आम्ही सर्व जुने व नवे पदाधिकारी हेवे- दावे विसरून कामाला लागलो आहोत, असे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
शहराध्यक्ष अग्रवाल म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास सुरु आहे. त्यांना पुन्हा एखादा पंतप्रधान करायचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विचार मानून आम्ही काम करत आहोत. सर्व मतभेद विसरून कामाला लागलो आहोत. मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांच्या भूमिकेबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, यावर आम्ही बोलू शकत नाही, असेही ते म्हणाले आहेत. आम्ही या मतदारसंघात भाजपचा खासदार व्हावा म्हणून काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
‘काय सांगता’वरील बातम्या पहाण्यासाठी क्लिक करा