दोन मुलींसह आईची रेल्वेखाली आत्महत्या

Mother with two daughters committed suicide under train

रायगड : रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे आईसह दोन मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने हे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे. अक्षरशः हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे. गोरेगाव येथील गावडे कॉम्प्लेक्स वसाहतीत राहणाऱ्या रीना जयमोहन नायर या महिलेने जिया आणि लक्ष्मी या १४ आणि ११ वर्षांच्या मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली पहाटे ३ वाजता आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला बोलले पण माझ्याकडून होत नाही, मी दोन मुलींना घेऊन रेल्वेखाली आत्महत्या करायला जात आहे,’ असा मेसेज करून आईने दोन मुलींसह आत्महत्या केली आहे. ‘जयमोहनला इकडे येऊन रूम सोडायला सांगा आणि माझे जे काही देणे आहे ते त्याला द्यायला सांगा’, असाही उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला होता. या मेसेजची माहिती रीना यांच्या मैत्रिणीला कळताच या मैत्रिणीने तात्काळ गोरेगाव पोलिस स्टेशन गाठले. रीना यांनी त्यांच्या वहिनीला केलेला मेसेज दाखवला त्यानंतर वेगाने सूत्रे हलली पण रीना आपल्या दोन मुलींसह हे जग सोडून गेल्या होत्या.

रीना यांचे यापूर्वी एक लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून एक मुलगी होती तर दुसऱ्या पतीपासून एक मुलगी, अशा दोन मुली त्यांना होत्या. मात्र रीना या आर्थिक संकटात सापडल्या होत्या. मुलींचं शिक्षण, खोलीचे भाडे यामुळे त्या हतबल झाल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती गोरेगाव पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पती कोणतीही आर्थिक मदत करत नव्हता. यामुळे आता जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजत आहे. रीना यांनी केरळ येथील जयमोहन नायर यांच्याशी प्रेमविवाह केला होता. पण, पती दुसरीकडे रहात होता, असे समजत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *