करमाळा (अशोक मुरुमकर) : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या काल (रविवारी) सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. कुर्डूवाडी येथील सभा संपल्यानंतर तेथून नगरकडे जाताना त्यांनी राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या घरी भेट दिली आहे. काही वेळासाठी सुळे वारे यांच्या निवासस्थानी थांबल्या. तेथे काही कार्यकर्त्यांशी त्यांनी संवादही साधला. रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांनी वारे यांच्या निवासस्थानी भेट दिली, असे समजत आहे. कुर्डूवाडी येथील सभेसाठी तालुकाध्यक्ष वारे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रा. अॅड. गोवर्धन चवरे, नलिनी जाधव, राजश्री कांबळे आदी गेले होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या घरी भेट
