लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. राजकारणात एकमेकांचे विरोधक असले तरी अनेकजण एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दिवसभर आपापली कामे संपवून ते एकमेकांना चहाच्या टपरीवर किंवा हॉटेलमध्ये भेटतात किंवा फोनवर चर्चा करतात. त्यातूनच एका ‘तुतारी’ प्रेमीने एक हास्यस्पद किस्सा सांगितला आहे.
करमाळा हा माढा लोकसभा मतदार संघात येतो. या मतदारसंघात भाजपने उमेदवारी न दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तुतारी हाती घेऊन उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. भाजपने मोहिते पाटील यांना डावलून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील हे कमालीचे नाराज झाले तेव्हापासूनच ते मोहिते पाटील यांनी तुतारी घ्यावी, असे उघडपणे बोलू लागले. त्यामुळे करमाळ्यात भाजपमधील व मोहिते पाटील समर्थक यांचे मित्रत्वाचे नाते असलेले अनेकजण सध्या एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्यांनी मात्र मैत्रीचे नाते कायम ठेवले असल्याचे दिसत आहे.
मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर मोहिते पाटील समर्थक जोरदारपणे कामाला लागले आहेत. आपले मित्र, नातेवाईक हे फोन करून भाजपची धोरणे कशी चुकीची आहेत हे सांगत आहे. त्यामुळे शरद पवार (महाविकास आघाडी) यांच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. तसेच आवाहन भाजपचे कार्यकर्ते देखील करत आहेत. काँग्रेस व शरद पवार यांच्यामुळे कसे नुकसान झाले असून भाजपची धोरणे चांगली कशी आहेत हे पटवून देत आहेत. अशातच माढा मतदार संघातील सांगोला येथील ‘कमळ’प्रेमी एका नातेवाईकाचा करमाळ्यातील ‘तुतारी’प्रेमीला फोन आला. ‘कमळ’प्रेमींची मुलगी ‘तुतारी’प्रेमीला दिली आहे. म्हणजे सासऱ्याचा जावईला फोन आला. त्या फोनचा हा किस्सा आहे. संबंधित किस्सा हा करमाळ्यातील एका ठिकाणी ऐकलेला आहे.
‘आपल्या सर्वांची हमी… माढ्यातून एक कमळ कमी’ हे ब्रीद डोळ्यासमोर करमाळ्यात मोहिते पाटलांचा प्रचार’
सासऱ्याने जावईला फोन केला. सुरुवातीला खुशाली विचारली. त्यानंतर इकडले- तिकडले विचारले. त्याची चर्चा सुरु असताना राजकीय विचारपूस सुरु झाली. दोघांनीही राजकीय वातावरण कसे आहे हे एकमेकांना सांगितले. जावईने करमाळ्यात वातावरण सांगताना ‘तुतारी’ला लीड मिळू शकेल असा अंदाज सांगितला. मात्र त्यावर सासरा म्हणला भाजपला आपण विजयी केले पाहिजे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. त्यांची धोरणे कशी चांगली आहेत हे सांगत असतानाच जावई चांगला भडकला आणि तो सासऱ्याला म्हणाला, आता मी सांगेल तेच तुम्ही ऐकायचे. तुम्ही यावेळी ‘तुतारी’ला मतदान द्या, अन्यथा मुलीला पाठवू नका. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर पक्ष फोडाफोडीमुळे झालेला अन्याय, महागाई, शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवायची असेल तर तुम्ही तुतारीला मतदान करा. मला माझ्या मुलांचे भवितव्य घडवायचे आहे, म्हणून तुतारीला मतदान करा, अन्यथा मुलीला पाठवू नका. संबंधित किशाची करमाळ्यात चर्चा आहे.
Loksbha election करमाळ्यात सोमवारपासून महायुतीच्या सभांचा धडाका! संपुर्ण तालुक्यात ‘असे’ असणार नियोजन