रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयाच्या स्वराज सभागृहामध्ये डॉ राजीव चव्हाण, भारलेसे, एनडीसी, .रक्षा लेखा प्रधान नियंत्रक यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनात ‘राष्ट्रीय पेन्शन योजने’विषयी एका भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यालयातील ‘नाकरा परिसरामध्ये सर्व भारलेसे अधिकारी आणि आमंत्रित व्याख्यात्यांद्वारे दीपप्रज्वलन करून या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. केंद्र सरकारच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करण्यासाठी भूतपूर्व भारलेसे अधिकारी श्री डी एस नाकरा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या या अविस्मरणीय कार्याचे स्मरण करून आणि त्यांना विनम्र अभिवादन व त्यांच्या प्रतिमेला पुष्मला अर्पण करून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला गेला.

यानंतर स्वराज सभागृहामध्ये प्रमुख अतिथी रक्षा लेखा संयुक्त नियंत्रक श्री बी एस कांबळे, भारलेसे यांचे स्वागत रक्षा लेखा उपनियंत्रक श्रीमती एस आर बोइड, भारलेसे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर रक्षा लेखा संयुक्त नियंत्रक श्री बी एस कांबळे, भारलेसे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री विशाल मसुरकर, प्रबंधक, एन एस डी एल, प्रोटीयन यांचे स्वागत केले व त्यांचा सर्व उपस्थितांना परिचय करून दिला. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश व त्याच्या महत्त्वाविषयी सर्वांना अवगत केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी भूतपूर्व भारलेसे अधिकारी श्री डी एस नाकरा यांच्या पेन्शन योजनेसंबंधी योगदानाविषयी सर्वांना माहिती देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कार्यालयातील प्रशिक्षण केंद्राला ‘नाकरा परिसर’ हे नाव देण्यात आल्याचे सांगितले.

या महत्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन ‘नाकरा परिसरा’मध्ये होणे हा एक महत्वपूर्ण योग आणि भाग्याची बाब आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातील 109 अधिनस्थ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सामील झाले.

श्री विशाल मसुरकर, प्रबंधक, एन एस डी एल, प्रोटीयन यांनी आपल्या पावर पॉइंट प्रस्तुतीकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय पेन्शन योजनेविषयी विस्तृत माहिती प्रदान केली. यामध्ये त्यांनी लाभार्थी अधिकारी व कर्मचारी, त्यांचे वेतन कार्यालय, या योजनेची संबंधित बँका आणि सर्व पेन्शन व्यवस्थापक संस्थांच्या कर्तव्यांची आणि जबाबदारीविषयी विस्तृत माहिती प्रदान केली. याबरोबरच पेन्शन योजनेच्या व्यवस्थापनामध्ये प्रोटीयन एजन्सीची भूमिका, राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये वर्गणीदारांना मिळणारा लाभ, त्यातील जोखीमेचे घटक, सरकारची भूमिका, वेळोवेळी होणारे नूतनीकरण किंवा परिवर्तन याविषयी त्यांनी सर्व उपस्थितांना सखोल माहिती दिली. यानंतर प्रश्नोत्तराच्या सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन, त्यांचे शंका समाधान प्रमुख वक्त्यांनी केले.

वरिष्ठ लेखा अधिकारी श्रीमती मधु गांधी यांनी प्रमुख वक्ते, उपस्थित अधिकारी व कर्मचारी आणि आयोजकांचे आभार मानले आणि दुपारी दीड वाजता कार्यक्रम समाप्त झाला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *