सोलापूर : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखाची लाच मागणारा संशयित पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. विक्रीम राजपूत असे यातील संशयिताचे नाव आहे. त्यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले आहे. राजपूत हे सोलापूर शहर एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
राजपूत यांनी एका गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करण्यासाठी दोन लाख रुपये लाच मागितीला होती. तडजोड करून त्यातील एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार सापळा रचून लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारण्याचा प्रयत्न करताना राजपूत यांना पकडले. त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या पथकात पोलिस उपाधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक श्रीराम घुगे, अतुल घाडगे, संतोष नरोटे, स्वामीराव जाधव, गजानन किणगी, शाम सुरवसे यांनी काम पाहिले.