करमाळा (सोलापूर) : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचा कंदर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री केसरकर यांना शालेय कामांसाठी निधी देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य आधिकारी मंगेश चिवटे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी धर्मराज लोकरे, प्रवीण लोकरे, हनुमंत लोकरे, सागर डोके, राम लोकरे, अजिंक्य काळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
