‘आदिनाथ’ची स्क्रॅप विक्री टेंडरप्रक्रिया पुन्हा रद्द

Scrap sale tender process of Adinath Karkhana Karmala canceled again

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची ‘स्क्रॅपी विक्री’ची टेंडर प्रक्रिया पुन्हा एखादा रद्द करण्यात आली आहे. साखर आयुक्तांच्या आदेशाने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे समजत असून याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालकांनी याबाबत पत्र दिले आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे स्क्रॅप मटेरियल ईलिलावाव्दारे विक्री केले जाणार होते. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु होती. मात्र ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अपरिहार्य कारणामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, असे कार्यकारी संचालकांनी पत्रात म्हटले असले तरी साखर आयुक्तांच्या आदेशाने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका व्यक्तीने ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *