Shelgaon ready to welcome Agriculture Minister Dhananjay Munde

करमाळा (सोलापूर) : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी करमाळा तालुक्यातील शेलगाव (वा) येथे येणार आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून बांधण्यातून आलेल्या सभागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी शेलगाव (वा) सज्ज झाले आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभारण्यात आली असून मंत्री मुंडे यांचे जेसीबीतून फुले टाकून स्वागत केले जाणार आहे, असे येथील दत्तात्रय पोटे यांनी सांगितले आहे.

शेलगाव येथे आमदार शिंदे यांच्या प्रयत्नातून स्थानिक विकास निधी अंतर्गत श्री संत वामनभाऊ भगवानबाबा मंदिरासमोर सभा मंडप उभारण्यात आला आहे. मात्र गकऱ्यांच्या आग्रहास्तव मंत्री मुंडे यांना येथे निमंत्रित करण्यात आले आहे. नगर- टेंभुर्णी महामार्गावर शेलगाव हे छोटे गाव आहे. या गावात मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मंत्री मुंडे यांनी येथे यावे यासाठी आमदार शिंदे यांच्या माध्यमातून गावकऱ्यांचे प्रयत्न सुरु होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *