करमाळा (सोलापूर) : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारणी आज (रविवारी) जाहीर झाली आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत ही कार्यकारणी जाहीर झाली. यामध्ये ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलचे पत्रकार अशोक मुरूमकर यांची संपर्कप्रमुखपदी निवड झाली आहे.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने हे आहेत. सोलापुर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथील कार्यकारणी जाहीर झाली. यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून दिनेश मडके, उपाध्यक्षपदी शितलकुमार मोटे व गौरव मोरे, सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकुर, सहसचिवपदी राजाराम माने, खजिनदारपदी सचिन हिरडे, संघटकपदी ज्ञानदेव काकडे, व्यवस्थापकपदी सुर्यकांत होनप, प्रसिद्धीप्रमुखपदी अंगद भांडवलकर यांची निवड झाली आहे.
तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून राहुल रामदासी, सिद्धार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे, सागर गायकवाड यांची तर ज्येष्ठ सल्लागार सदस्यपदी महेश चिवटे, ॲड. बाबुराव हिरडे, नासीर कबीर, आशपाक सय्यद, अशोक नरसाळे, डी. जी. पाखरे यांची निवड करण्यात आली आहे. मडके म्हणाले, ‘प्रिंट मिडियाप्रमाणेच डिजीटल मिडियाला सरकारच्या जाहिराती व अधिस्विकृती मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. पत्रकार सुरक्षा विमा योजना पत्रकार कुटुंब कल्याण योजना, पेन्शन योजना, पत्रकारांना सरकारदरबारी नोंद होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघ कार्यरत राहणार आहे.’