करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत शरद पवार व अजित पवार यांच्या दोन्ही बाजूंनी दावे- प्रतिदावे केले जात असले तरी नेमके आकडे कोणीच सांगत नाही. मोजके आमदार आणि नेते सोडले तर बहुतांश पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. करमाळा तालुक्यात देखील अनेक पदाधिकारी संभ्रमात असून तटस्थ राहणे पसंद करत आहे.
राष्ट्रवादीत नेमकी कोणाची ताकद जास्त आहे आज समजणार आहे. मुंबईत आज शरद पवार व अजित पवार यांच्या गटाची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी करमाळ्यात दोन्ही गटाचे काही पदाधिकारी गेले आहेत. त्यांनतर चित्र स्पष्ट होणार आहे. करमाळ्यातील अनेक कार्यकर्तेही तटस्थ आहेत. साहेब की दादा हा निर्णय घेत नाहीत असे दिसत आहे. अनेकांच्या तोंडी राजकारण सोडण्याची भाषाही केली जात आहे.