निवडणूक काळात जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्यातून दोनच दिवस भेटता येणार

Solapur District Collectors can meet only two days a week during the election period

सोलापूर : लोकसभा निवडणूकच्या अनुषंगाने अभ्यागतांनी कार्यालयीन कामकाज दिवसांमध्ये सोमवार व शुक्रवार या दोन दिवशीच दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजता या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांनी निश्चित केलेल्या वेळेतच जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावी. ही वेळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीपर्यंत राहणार असून त्यानंतर पूर्वी प्रमाणेच अभ्यागत भेटण्याची वेळ दररोज राहील. अभ्यागातांनी जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *