Voting in seven phases in Maharashtra voting in third phase for Solapur and Madha and result on 4 June

देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. तर ४ जूनला निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून १९, २६ एप्रिल व ७, १३, २० मे रोजी मतदान असणार आहे. त्यात सोलापूर व माढा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे रोजी मघेता तदान असणार आहे, अशी घोषणा मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली आहे. १२ एप्रिलपासून अर्ज दाखल करता येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात (१९ एप्रिलला मतदान) : रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर.
दुसऱ्या टप्प्यात (२६ एप्रिलला मतदान) : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशीम, हिंगोली, नांदेड व परभणी.
तिसऱ्या टप्प्यात (७ मे रोजी मतदान) : रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर व हातकणंगले.
चौथा टप्पा (१३ मे रोजी मतदान) : नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी व बीड.
पाचवा टप्पा (२० मे रोजी मतदान) : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर- पश्चिम, मुंबई उत्तर- पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य व मुंबई दक्षिण.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *