Solapur Municipal Corporation has implemented water campaign for women for womenSolapur Municipal Corporation has implemented water campaign for women for women

सोलापूर : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, सोलापूर महापालिका, अमृत 2.0 अंतर्गत 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ‘जल दिवाळी साजरी करण्यासाठी सोलापूर महापालिकेकडून Women for water, Water for Women Campaign (पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान) हा उपक्रम राबविण्यात आला.

सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून 7 नोव्हेंबर 2023 रोजी 50 महिलांना भवानी पेठ जलशुद्धीकरण येथे स्वयंसहाय्यता बचत गटामधील ( SHGs) महिलांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. या भेटींमुळे त्यांना घरोघरी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या विविध प्रक्रियांची माहिती मिळाली. शिवाय, नागरिकांना उच्च- गुणवत्तेचे पाणी मिळेल याची खात्री करून घेणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रक्रियेबद्दल त्यांना शिक्षित केले गेले.

पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये आपलेपणा आणि मालकीची भावना वाढवणे हा या भेटींचा मुख्य उद्देश होता. शिवाय या भेटींमुळे महिलांना मुलाखतींच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी निर्माण झाली, सर्वसमावेशकता आणि सहभाग याला चालना मिळेल तसेच एकूणच गटांमधील महिलांचा अनुभव वाढविण्यासाठी, स्मृतीचिन्ह आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू भेट म्हणून देण्यात आले.

सोलापूर मनपा आयुक्त शीतल तेली उघले यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त, शहर प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड यांच्या सूचनेनुसार शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी, गिरीश तंबाके, उज्ज्वला गणेश, शहर अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व समुदाय संघटक यांनी परिश्रम घेतले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *