करमाळा : भाजप कार्यालयासमोर जल्लोष करताना गणेश चिवटे यांच्यासह उपस्थित कार्यकर्ते.

करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पहिल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड विधानसभा निवडणुक निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारल्यानंतर करमाळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वखाली हा जल्लोष झाला.

‘राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपला विजयी केले आहे, चिवटे यांनी सांगितले आहे. कर्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता. भाजपचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, बाळासाहेब कुंभार, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, विनोद महानावर, शाम सिंधी, अजिनाथ सुरवसे, संजय घोरपडे, सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे, विजयकुमार नागवडे, महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे, चंपावती कांबळे, नितीन कानगुडे, दादासाहेब देवकर, पोथरेचे माजी सरपंच विष्णू रंदवे, अशोक शहा, हर्षद गाडे, भैय्याराज गोसावी, विशाल घाडगे, दीपक गायकवाड, कैलास पवार, शरद कोकिळ, गणेश महाडिक, महादेव गोसावी, उमेश मगर, मस्तान कुरेशी, सूरज लष्कर, हनुमंत फरतडे आदी यावेळी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *