The meeting is over The date of Bagal group entry into the BJP has been decided

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा बागल गट भाजपात प्रवेश करणार आहे. मंगळवारी (ता. २७) मुंबई येथे हा प्रवेश होणार आहे. यासाठी आज (शनिवारी) बागल गटाच्या कार्यकर्त्यांची संपर्क कार्यालय येथे महत्वपूर्ण बैठक झाली आहे. या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश करण्याची आग्रही इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती आहे.

मकाई व आदिनाथ कारखान्यामुळे बागल गट अडचणीत आहे. मकाई साखर कारखान्याची ऊसबिले थकलेली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बागल गट भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा चौकाचौकात सुरु होती. बागल गटाने भाजपात प्रवेश करावा, अशी बागल गटातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यासाठी कार्यकर्त्यांची आज बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.

या बैठकीला बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोणत्याही अटीशर्तीविण हा प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *